Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठातापदी डॉ. अनिल चिताडे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 5 जून- गोंडवाना विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता (डीन) पदावर डॉ. अनिल चिताडे यांची नियुक्ती झाली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ.शैलेंद्र देव यांच्याकडे पदभार होता. परंतु चंद्रपुर जिल्यातील कोरपना तालुक्यातील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात प्राचार्य पदी ते रुजू झाले आहेत. म्हणून हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता (डीन) पदाचा प्रभारी पदभार डॉ. अनिल चिताडे यांच्या कडे होता. परंतु या पदावर त्यांची आता नियुक्ती झाली आहे.

चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आणी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले. डॉ. अनिल चिताडे गोंडवाना विद्यापीठात परीक्षा संचालक असताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ऑनलाइन परीक्षा सुरळितपणे पार पाडण्यासाठी कौतुकपर अभिनंदनाच पत्र पाठवून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच कुलसचिव (प्रभारी) पदाचा यशस्वीपणे कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे.
या निमित्ताने कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन ,अधिष्ठाता मानव विज्ञान शाखा डॉ. चंद्रमौली ,नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनिष उत्तरवार, उपकुलसचिव दिनेश नरोटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.