रोजगार व उदयोगास गती देण्याच्या दृष्टीने मेट्रो रेल कॉर्पोरेशला सवलती देण्यासंदर्भात शासन सकारात्मक -विधानसभा अध्यक्ष नाना पटोले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, दि. ०६ नोव्हें: नागपूर महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या दोन स्वतंत्र मार्ग प्रस्तावित आहेत. या मेट्रो रेल संदर्भातील काम उद्योग व रोजगाराशी संबंधीत असल्याने ताळेबंदीचा विचार करून स्टेशन सभोवतालच्या दोन्ही बाजूस ५०० मीटर अंतरापर्यंत अभिक्षेत्र निर्देशांकात (एफएसआय) सवलत देण्यासंदर्भात याचबरोबर खरेदी – विक्री करारपत्रावर सवलत देण्यासदंर्भात शासन सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करेल असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
आज विधानभवन येथे नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थांकडून आकारण्यात येणा-या करांमध्ये टप्प्यानुसार सवलत मिळण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष नाना पटोले बोलत होते. या बैठकीस महसूल विभागाचे उपसचिव संजय बनकर, नगरविकासचे प्रणव कर्वे, यासह मेट्रो प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, टीओडी क्षेत्रासाठी टप्प्या-टप्प्याने अधिमूल्य वसुली करण्यासंदर्भात सवलत देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल. मेट्रो चे काम हे उद्योग आणि रोजगाराशी संबंधीत आहे. संबंधित काम वेळेत पूर्ण झाल्यास रोजगाराच्या दृष्टीने स्थानिकांना याचा लाभ होईल. याचबरोबर मुद्रांक शुल्काबाबत मार्गदर्शक सुचनांत योग्य ते बदल याबरोबरच खरेदी विक्री करारावरील शुल्कात सवलती देण्यासंदर्भातील निर्णयावर सकारात्मक विचार करण्यात येईल असेही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
Comments are closed.