Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामसभांनी सक्षम व्हावे – जिल्हाधिकारी संजय मिना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कोरची, दि. १५ सप्टेंबर : ग्रामसभांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातुन देण्यात येणा-या विविध माहिती आत्मसात करून आपला विकास साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी, संजय मिना यांनी केला. जिल्हा प्रशासन आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजीत एकल ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोरची चे तहसिलदार सोमनाथ माळी, गट विकास अधिकारी राजेश फाये, उपवनसंरक्षण अधिकारी ठाकरे नोडल अधिकारी एकल सेंटर चेतना लाटकर, कृषी तज्ञ मंगेश भानारकर, विकास तज्ञ स्वप्नील पिपळे, लघु लेखक सिताराम बुरे आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरची येथील सामुहीक वनहक्क प्राप्त ग्रामसभासाठी एकल ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी संजय मिना यांनी ग्रामसभांचे अधिकार आणि हक्क, गोणवनोपजाच्या माध्यमातून ग्रामसभांनी घ्यवयाचे उत्पादन आणि साधावयाचा विकास याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामसभाच्या सक्षमीकरणाकरीता अध्यक्ष जिल्हा परिवर्तन समिती व ग्रामसभा यांचेमध्ये सामंजस्य करार करण्यात आले कोरची तालुक्यात महाग्रामसभा व आम्ही आमच्या आरोग्य साठी या दोन्हीच्या मार्गदर्शन खाली या अगोदर 39 सामंजस्य करार केला आहे हे विशेष.

कार्यक्रमाचे संचालन विनोद गडपायले यांनी केले तर आभार गट विकास अधिकारी राजेश फाये यांनी मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमास तालुक्यातील 48 ग्रामसभांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सचिव व तलाठी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

प्रसूतीसाठी नेताना वाटेतच आणखी एक मृत्यू

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत यावा यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची वेळ – विरोधीपक्षनेते अजितदादा पवार

 

Comments are closed.