Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पडियालजोब येथे सामुहिक गोटूलचे पारंपारिक पद्धतीने थाटात उद्घाटन.

गोटूल म्हणजेच पारंपारिक विद्यापीठ: झाडूराम हलामी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
रवि चूनारकर 

कोरची दि ०७ डिसेबर : पडियालजोब येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान  तथा लोक सहभागातून बांधकाम केलेले सामुहिक गोटूल चे उद्घाटन करण्यात आले. गोटूल हि  आदिवासी समाजाची पारंपारिकरित्या  शिकण्याची पद्धती आहे. जेव्हा शाळा कॉलेजेस नव्हते तेव्हा, गावा गावात गोटूल शिक्षण पद्धतीच होती. गोटूल शिक्षण पद्धती मध्ये विचारांची, परंपरांची व आपल्यातील कला कुसराची देवान घेवाण होते त्यामध्ये कुठलाही शिक्षक नसतो. हल्ली अशा शिक्षण पद्धतींचा ऱ्हास होतो आहे, अशा परंपरांना पुनर्जीवित करण्यासाठी पडियालजोब गावाने ग्रामसभेच्या माध्यमातून गोटूल चे बांधकाम केले. ग्रामसभेने निर्णय घेऊन प्रत्येक व्यक्तीचा हात  गोटूल बांधकाम्साठी कसा लागू शकेल याची पुरेपूर खबरदारी घेतली, श्रमदान त्याला आपण श्रमसंस्कार म्हणू, हा गोतुल बांधकामातील मुख्य अंग होता, गोटूल ला लागणाऱ्या विटा लोकांनी स्वतः बनवल्या, ग्रामसभेकडे इतर माध्यमातून होणार्या रक्कमेतून सदर बांधकाम पूर्ण करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पडियालजोब ग्रामसभेला वनहक्क कायद्यानुसार १४८९.९० हे. आर सामुहिक वनहक्क प्राप्त झाले आहे आणि तेव्हापासून ग्रामसभेचा कायापालट झाला. ग्रामसभा आळी-पाळीने जंगल गस्त करतात, जंगलातील संपूर्ण घटकांवर ग्रामसभेचा अधिकार आहे आणि त्याला जगवणे हे आमचे कर्त्तव्य आहे असे गावातील लोक म्हणतात. उन्हाळ्यात वनवा लागू नये म्हणू पुरेशी खबरदारी घेतल्या जाते आणि वनवा  लागलाच तर तत्पतरतेने ते विझवल्या जाते. कोरोना काळात जेव्हा संपूर्ण शाळा बंद होत्या तेव्हा या आदिवासी बहुल गावातील अशिक्षित लोक एकत्र बसून गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षाणाचा तोडगा काढला. अवाढव्य खर्च वाचविण्यासाठी सामुहिक करसाळ  केलेत, टावर लाईन चा लढा देऊन गौण वनोपजावरील मोबदला मिळवला, २०१७ पासून ग्रामसभा स्वतः तेंदूपत्ता व बांबूचे विक्री करत आहेत. ग्रामसभेला रोजगार हमिची  अमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित केल्या गेले आहे लवकरच काम सुरु होतील. अशे विविध  कामे गावात सुरु आहेत, गावाला स्वयंपूर्ण करण्यासाठी ग्रामसभा सर्वोतपरी प्रयत्न करत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संपूर्ण गाव उपस्थित होता. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चमारू पोरेटी, गाव पुजारी व सहउद्घाटक म्हणून तुलाराम पोरेटी तीस गाव इलाका पुजारी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये हे होते. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून कुमारीताई जमाकातन, झाडूराम हलामी व इजामसाय काटेंगे हे होते. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या उक्तीवर कुमारीताई जमाकातन यांनी विस्तृत माहिती दिली. संघटीत राहून काम करणे का गरजेचे आहे हे इजामसाय काटेंगे ने छोटे-छोटे दाखले देऊन स्पष्ट केले. काटेंगे म्हणजेच पारंपारिक विद्यापीठ आहे  असे सामाजिक कार्यकर्ते झाडूराम हलामी यांनी प्रतिपादन केले.  ग्रामसभेची जडण-घडण बद्दल राजाराम नैताम व मदन पोरेटो यांनी संभाषण केले. गोटूल साठी जागा उपलब्ध केल्या बद्दल चामरू पोरेटी यांचा सत्कार करण्यात आला. कार्क्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून, शेडमाके सर, अतकरे सर, बोके सर, दुर्गा मडावी, कल्पना नैताम, मथुरा नैताम, महेश लाडे, रविंद्र चुनारकर हे उपस्थित होते. त्याच प्रमाणे गाव गावातून आलेले लोक व सहयोगी संस्था आम्ही आमच्या आरोग्यासाठीचे कार्यकर्ते सतीश कुसराम, बंडू दामले, चेतन चौधरी उपस्थित होते.जल्लोषात पारंपारिक पद्धतीने सामुहिक गोटूल चे लोकार्पण करण्यात आले.

हे पण वाचा :-

Comments are closed.