Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलवाद्यांशी लढणारया पोलीस जवानांना येल्चील पोलीस मदत केंद्र येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली दिवाळीनिमित्य भेट..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली:-१५ नोव्हें.
राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सुमारास पोलीस मदत केंद्र येलचिल येथे आगमन झाले.पोलीस जवानांना दिवाळी ची मिठाई पोलीस जवानां आणी त्यांच्या कुटुंबिसोबत वाटप करुण दिवाळी साजरी केली.

नक्षलवाद हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळी निमित्य भेट देऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस जवानांची उमेद जिल्हापासुन पासून १५० किमी. अंतरावर असलेल्या येलचिलला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली .
पालकमंत्री यांनी भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या दिवाळीचा आनंददायी सण कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही.गडचिरोली सारख्या दुर्गम भागात पोलीस घरापासून आपल्या आई-वडिलांनपासून,भावंडापासून,पत्नी-मुलं बाळा पासून दूर असाल याची मला जाणीव आहे त्याकरीत मी तुमचं मनोबल वाढवण्यासाठी इथे आलेलो आहे असे शिंदे साहेब म्हणाले..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमप्रसंगी पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील ,पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते

Comments are closed.