Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! लग्नाच्या सहाव्या महिन्यातच तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सोलापूर १२ ऑगस्ट :उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी येथील शिवकुंज  बाळासाहेब कुंभार या 26 वर्षीय तरुणाचा आज पहाटे झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.

मागच्या 15 फेब्रुवारीला नुकतंच शिवकुंज विवाहबंधनात अडकला होता. विवाहानंतर अवघ्या सहा महिन्यातच अकाली मृत्यूमुळे  ‘अर्ध्यावरति डाव मोडला.. अधुरी एक कहाणी..!’ अशी अवस्था झाल्याने  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मनमिळाऊ,निर्व्यसनी असणारा शिवकुंज शिवभक्त होता. श्रावण आरंभाच्या पूर्वसंधेला श्रीक्षेत्र रामलिंग मंदाराचे दर्शन घेऊन आला होता. शिवकुंजच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबियांना मित्रमंडळी,नातेवाईकांना धक्का बसला. त्याच्या मृत्यूने अकोलेकाटी शोककळा पसरली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवकुंज पश्चात आई , वडील ,पत्नी ,लहान भाऊ आहेत.  शिवकुंज हा सोलापूरमधील गितांजली पेंट शोरुम मध्ये एशियन पेंटचे मार्केटिंचे काम पाहत होता. धार्मिकवृत्ती असणाऱ्या शिवकुंजला पर्यटनाची  भारीआवड असल्याने जुलैमध्ये बदामी (कर्नाटक),

ऑगस्टमध्ये दांडेली (कर्नाटक) आणि रविवारी रामलिंगची सफर करुन आला होता.  ऑक्टोबर महिन्यात पत्नीसह केदारनाथलाही  जाण्यासाठी सर्व  ऑनलाईन बुकिंग केले होते. त्याच्या मृत्यूने अकोलेकाटी शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या आदेशाला सरकारने दिली स्थगिती, टास्क फोर्सच्या बैठकीनंतरघेतला निर्णय

 

अन…’ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली’, आ.प्रणिती शिंदें

 

 

गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर:पोलीस अधीक्षक अंकित गोयल

 

Comments are closed.