कालेश्वर पुष्करालमध्ये भाविकांची गर्दी; अजय कंकडालवार यांची कुटुंबासह भेट..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कालेश्वर (ता. सिरोंचा) : येथील प्राचीन आणि पवित्र अशी कालेश्वर तीर्थक्षेत्र सध्या पुष्कराल महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांच्या गर्दीने गजबजले आहे. या धार्मिक वातावरणात सिरोंचा तालुक्यातील विविध भागांतून तसेच सीमावर्ती तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांतून हजारो भाविक दररोज येथे दर्शनासाठी येत आहेत.
याच दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अजय कंकडालवार यांनी आपल्या परिवारासह कालेश्वर तीर्थक्षेत्राला भेट दिली. त्यांनी ‘गंगा स्नान’ करून आध्यात्मिक शुद्धीचे क्षण अनुभवले. त्यानंतर कालेश्वर मंदिरात माता सरस्वतीचे विधिवत दर्शन घेतले.
येथील काळेश्वर मंदिर हे प्राचीन असून शंकर भगवानाचे स्वयंभू लिंग येथे विराजमान आहे. अजय कंकडालवार यांनी विशेष पूजन करून भगवान शंकराचे दर्शन घेतले आणि लोककल्याणाची प्रार्थना केली.
स्थानिक श्रद्धाळूंनी आणि पुजाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या उपस्थितीमुळे अनेक भाविकांनी प्रेरणा घेतली आणि या तीर्थक्षेत्राच्या आध्यात्मिकतेची पुनःप्रचिती घेतली.
सध्या सुरू असलेल्या पुष्कराल महोत्सवात स्नान, दर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आध्यात्मिक प्रवचनांची रेलचेल असून स्थानिक प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था केली आहे.
Comments are closed.