गृहमंत्र्यांनी राज्याच्या टोकावर असलेल्या दुर्गम, नक्षलग्रस्त, भागात असलेल्या पातागुडम पोलीस मदत केंद्रात केली दिवाळी साजरी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली १४ नोव्हेंबर;- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सपत्नीक जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथील पोलीस मद्त केन्द्रामध्ये पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली आहे समोर बोलताना गृहमंत्री यांनी म्हणाले जनतेच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मी दुर्गम नक्षलग्रस्त भागात सपत्नीक आलो असून कर्तव्यनिष्ठ जवानां सोबत दिवाळीचा उत्सव मनविने महत्वाचे संमजतो.हजारो कि.मी. अंतरावरुण अधिकारी ,जवान नक्षल ग्रस्त दुर्गम भागात सुख सुविधा अपुरी असतानाही दिवाळी उत्सव आपल्या स्वगावी न जाता रक्षणासाठी राहतात ते माझ्या दृष्ठिने अधिक महत्वाचे असल्याने पोलिसांसोबत दिवाळीचा आनंद सोबत घेत आहे. मला कुटुंब व मित्रांसोबत उत्सव साजरा करायला जमत नाही .मि राज्याचा गृहमंत्री आणि पोलीस दलाचा कुटुंब प्रमुख असल्याने त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करून आनद द्विगुणीत करीत आहे.
नुकत्याच कोरची तालुक्यात पाच नक्षल्याचा ख़ात्मा पोलीस जवानांनी केला आहे. त्या अधिकारी जवानाचे अभिनंदन ,कौतुक केले याप्रसंगी देशमुख यांनी पोलिसांच्या अडीअडचणी समजून घेत सरकार सदैव पोलिस दलाच्या पाठीशी आहे .लवकरच पोलिसासाठी पातागुडम येथे १५ ते२० इमारत बंनविन्याचा प्रस्ताव पाठवून संपूर्ण सुख सुविधा उपलब्ध करुण देवू असे आस्वासन दिले.. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटिल, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह अधिकारी, पोलिस जवान आणि कुटुंबीय उपस्थित होते..
Comments are closed.