लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मीरा-भाईंदर, दि. ७ ऑक्टोंबर : पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन तसेच नशामुक्तीकरिता विद्यार्थ्यांसमवेत जनजागृती रॅली. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक १/१०/२०२२ ते ७/१०/२०२२ पर्यंत पोलीसांकडून विशेष सप्ताह राबविण्यात येत असून सदर मोहिमेअंतर्गत दिनांक ६/१०/२०२२ रोजी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये कार्यरत असणा-या सर्व पोलीस अधिकारी , अंमलदार तसेच मंत्रालयीन स्टाफकरिता आरोग्य
तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरादरम्यान कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी , अंमलदार व कर्मचारी यांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
त्याचप्रमाणे वालीव पोलीस ठाणेमार्फत नायगांव परिसरामध्ये व्यसनमुक्ती जनजागृतीकरिता शाळकरी विद्यार्थ्यांसमवेत रॅली काढण्यात आली. व्यसनामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर तसेच कौटूंबिक जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत सदर रॅलीदरम्यान बोर्ड तसेच घोषणेद्वारे जनजागृती करण्यात आली.
हे देखील वाचा :
Comments are closed.