आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली राज्यातील जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशिम, दि. ०१ जानेवारी: राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे काल दि.31 डिसेंबर पासून वाशिम जिल्ह्यात खासगी दौऱ्यावर असून त्यांनी आज पहाटे नववर्षाच्या पहिल्या दिवशी वाशिम येथील ऐतिहासिक बालाजी मंदिराला भेट देऊन श्री बालासाहेबांचं दर्शन घेऊन तेथे विधिवत पूजा-अर्चना करीत, आपल्या नववर्षाचा प्रारंभ केला.
या वेळी त्यांनी नवीन वर्षात राज्यात सुख-समृद्धी नांदो आणि राज्यातील जनतेच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली. त्या नंतर ते बंजारा समाजाची काशी असलेल्या जिल्ह्यातील पोहरादेवी ता. मानोरा येथील जगदंबा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच बंजारा समाजाचे श्रध्दा स्थान संत सेवालाल महाराज आणि धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाराजांचे उत्तर अधिकारी बाबूसिंग महाराजांची भेट घेऊन पोहरादेवी या धार्मिक पर्यटन स्थळाच्या विकास विषयक योजनांची माहिती घेतली. तसेच सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे ह्यांची उपस्थिती होती.
Comments are closed.