गडचिरोलीत मुसळधार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २४ मे (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण अनुभवत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासून मान्सून पूर्व मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आकाशात काळसर ढग दाटून आले असून, रिमझिम सरींनंतर आता जोरदार पावसाने परिसर झोडपून काढला आहे.
उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी हा पाऊस आनंदाची बातमी ठरली असून, आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तो उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
पावसामुळे काही भागांत किरकोळ वाहतूक अडथळे निर्माण झाले असले, तरी अद्यापपर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Comments are closed.