संत गाडगेबाबा स्मृती प्रित्यर्थ मृत्यू पावलेल्या शेतकरी कुटुंबास मदत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, २१ डिसेंबर: वैराग्यमुर्ती गाडगे महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त संत गाडगेबाबा यांनी दिलेल्या संदेशा प्रमाणे शेती वर फवारणी करतांंना मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाला मदत करण्यात आली.
शिराळा येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण समरित यांच्या 21 वर्षीय मुलाचा गावातील शेतकऱ्याच्या शेतात विषारी औषधाची फवारणी करतांंना मृत्यू झाला. घरातला कमावता मुलाचा मृत्यू झाल्याने समरीत कुटुंबावर संकट कोसळले, आज गाडगेबाबा यांच्या स्मृती प्रित्यर्थ
संत गाडगे महाराज वृध्दाश्रम संस्था वलगांव तर्फे डॉ कैलास बोरसे यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. अजुन पर्यंत कुणीही या कुटुंबाला मदत केली नसल्याचं समरीत यांनी सांगितले.
Comments are closed.