Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईत हाय अलर्ट जारी,ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता.

मुंबई:- सणासुदीला सुरुवात झाली असून मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. काही दिवसांत दिवाळीचा सण आहे. दिवाळी सण हा मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी मुंबईकर मोठया प्रमाणावर घराबाहेर पडतात. यावेळी वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करु शकतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईत छोटया ड्रोन उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या काळात मुंबईमध्ये सुरक्षा बंदोबस्त देखील वाढवला जाऊ शकतो. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम १८८ अतंर्गत कारवाई होऊ शकते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सध्या संपूर्ण देशात अनलॉकचा फेज सुरु आहे. करोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. गर्दीमध्ये करोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क घालण्यासह सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन वारंवार यंत्रणांकडून केले जात आहे.

Comments are closed.