जगभरात पोहोचेल हिंदी विश्वविद्यालय: केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल
वर्धा, दि. ८ जानेवारी: केंद्रीय शिक्षण मंत्री श्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आज म्हणाले की महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय जगभरात पोहोचेल. श्री ‘निशंक’ आज (शुक्रवार) महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धाच्या चतुर्थ दीक्षांत महोत्सवात मुख्य अतिथी म्हणून ऑनलाइन संबोधित करत होते.
आपल्या दीक्षांत भाषणात केंद्रीय मंत्री म्हणाले की आज जे विद्यार्थी उपाधी घेवून योद्धया प्रमाणे या विश्वविद्यालयातून बाहेर पडत आहेत त्यावर गांधीजींची मोहोर आहे. हे विश्वविद्यालय गांधीजींच्या स्वप्नाचे जीवंत प्रतीक आणि शक्तिचे पुंज आहे. हे विश्वविद्यालय तक्षशिला व नालंदा सारख्या ज्ञानाचे वैश्विक केंद्र होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वर्धा विश्वविद्यालय विधीचे शिक्षण हिंदी माध्यमातून सुरू करत आहे यावर त्यांनी प्रसन्नता व्यक्त केली. भारतीय भाषांमध्ये आता अभियांत्रिकी, चिकित्सा आणि विधीचे शिक्षण शक्य होणार आहे असेही ते म्हणाले. गांधीजीच्या नई तालीमने प्रेरित राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मातृभाषेत शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संकल्पबद्ध आहे. विश्वविद्यालयात स्थापित भारतीय अनुवाद संघाकडून ब-याच आशा आहेत. यामुळे एका भाषेतील संचित ज्ञान दुस-या भाषेत येवू शकले. आतापर्यंत अनुवाद संघात 64 भाषांमधील 1100 अनुवादक संलग्न झाले आहेत ही खरोखरच आनंदाची बाब आहे असेही ते म्हणाले.
दीक्षांत महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना विश्वविद्यालयाचे कुलाधिपति प्रो. कमलेश दत्त त्रिपाठी म्हणाले की आज महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे दायित्व वाढले आहे. राष्ट्रीय दृष्टीने आज भारतीय भाषा व हिंदीची अपेक्षा आणि त्यांची संपूर्तिची अपूर्व संभावना उपस्थित झाली आहे. ते म्हणाले की संपूर्ण विश्वात भारतवंशी विद्यमान आहेत त्यांच्यापाशी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात पोहोचलेपाहीजे. हिंदी व भारतीय भाषांना आपली गौरवपूर्ण ज्ञान परंपरा टिकवून ठेवत नवीन आणि आविष्कृत ज्ञानाची ऊर्जा ग्रहण केली पाहिजे. तसेच नव्या दिशेने आपल्या परंपरेनुसार तिला विकसित करत जगासमोर सादर केली पाहिजे. यामुळे नव्या विश्वनिर्मितीचा मार्ग सुकर होईल असेही ते म्हणाले.
कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचा उल्लेख करतांना कुलगुरू प्रो. शुक्ल म्हणाले की कोरोना काळात विश्वविद्यालय परिसर कोरोना पासून मुक्त होता. विश्वविद्यालयाने 17 मार्च 2020 पासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आणि 90 टक्यापेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 10 गावांचे सर्वेक्षण केले व 400 पानांचा अहवाल तयार केला. ते म्हणाले की विश्वविद्यालयाने सामाजिक संपर्क व उत्तरदायित्वाचा परिचय देत कोरोना काळात 2 हजारापेक्षा जास्त गरजवंतांची मदत केली. विश्वविद्यालयाने कोरोना नियमांचे पालन करतांना 11 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय वेबिनार हिंदी माध्यमातून संपन्न केले, ज्यामध्ये 7 पेक्षा अधिक देशांतील अध्यापकांनी हिंदी मध्ये आपले विचार मांडले.
कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी ऑनलाइन माध्यमातून 54 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक व 801 स्नातकांना (ज्यामध्ये 117 विद्यार्थ्यांना पी-एच.डी., 43 विद्यार्थ्यांना एम.फिल., 453 विद्यार्थ्यांना स्नातकोत्तर व 188 विद्यार्थ्यांना स्नातक) उपाधि प्रदान केली.
दीक्षांत महोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. प्रमोद येवले, संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. मुरलीधर चांदेकर, कार्य परिषदेचे सदस्य प्रो. योगेंद्र नाथ शर्मा, प्रो. नीरजा अरुण गुप्ता, कोर्टचे सदस्य रवींद्र लोखंडे, विश्वविद्यालयाचे प्रकुलगुरु द्वय, अधिष्ठाता गण, विभागाध्यक्ष गण, कुलसचिव व कार्य परिषद आणि विद्या परिषदेचे सदस्य ऑफलाइन व ऑनलाइन उपस्थित होते.
विश्वविद्यालयाचा हा 24वां स्थापना दिवस होता. यानिमित्त सकाळी 10 वाजता कुलाधिपति प्रो. कमलेश दत्त त्रिपाठी यांनी विश्वविद्यालयाचा ध्वज फडकविला. कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल आणि विश्वविद्यालय परिवाराचे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
Comments are closed.