राष्ट्रवादीला सूरज माडुरवारांचा रामराम
संदीप गिर्हे,संदीप करपे यांच्या उपस्थीती शेकडो समर्थकांनी बांधले शिवबंधन.
गोंडपिपरी १३ डिसेंबर :- जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदीप करपे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम अनेक कार्यकर्त्यांसोबत ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आधीच राजकीय भूकंप निर्माण होवून भाजपात मोठी दरी निर्माण झाली होती. आणि अश्यातच गेल्या आठ -दहावर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या युवकाने राजकारणात येवून सामान्य माणसाचा विश्वास संपादन करून गळ्यातील ताईत झाले होते.कुठलेही काम असो ” सुरज नाम हि काफी है “ असा धृढ विश्वास निर्माण केला होता.
मात्र ज्या राष्ट्रवादी पक्षात विश्वासावर नजर लागली आणि पक्षांतर्गत असलेली धुडगूस ,गटबाजी समोर आली . त्यामुळे अनेक निर्णय घ्यायला अडचण निर्माण होत होते . शेवटी राष्ट्रवादिला सोडण्याचा निर्णय घेवून सुरज माडूरवार यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकले असून आज शिवसेना पक्षाला निर्णयात्मक न्याय देणारे पक्ष समजून गोंडपिपरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकित शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेशकरून शिवबंधन बांधले.
युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष सुरज माडूरवारांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला असून सामाजिक दायित्व पार पाडण्यासाठी “गोंडपिपरी यंग ब्रिगेट” नावाने सामाजिक संघटन ऊभारले आहे गावागावात संघटना तयार करून न्याय जनमानसात पोहचविण्याचा विडा उचललेला होता .आणि यानंतर कोणत्या पक्षात जातील यावर तर्क वितर्क असताना आज रविवारी (दि.१३) आठ -दहावर्षांपासून राष्ट्रवादीचे असलेले सबंध कायमचे तोडत शेकडो कार्यकर्त्यांसह माडूरवारांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे,नगरसेवक राजू डोहे,जिल्हा उपप्रमुख बबन उरकुडे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदिप करपे,संजय माडुरवार,नरेंद्र इंगोले,बब्बू पठाण,अशपाक कुरेशी,विवेक राणा,आनंदराव गोहणे,शैलेशसिंह बैस,हरमेलसिंग डांगी,आशिष कावटवार,गौरव घुबडे,निकेश बोरकुटे,गौरव घुबडे,अक्षय भोयर,नबात सोनटक्के,तुकाराम सातपुते,रुज्जीक कुरेशी,संतोष उराडे,संतोष धोडरे,यादव झाडे,प्रमोद दुर्गे,निलेश पदमगिरीवार,गणेश वाघाडे, प्रमोद बुरीवार,रवी बावणे,पुरुषोत्तम राऊत,राजेश देवगडे,रियाज कुरेशी,दिनेश रामगिरकर, विवेक राणा,सुधीर पेंढारकर,जाफिर शेख,शनकर नायगमकर,वंदेश तेलसे,हर्षल सर्व्हर,विनय गड्डेकर,शुभम भोयर,प्रवीण तांगडे,बंटी भोयर,राहुल मेकर्तीवर आदिंची उपस्थिती होती.गोंडपिपरी नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूकांच्या पाश्वभुमिवर माडूरवारांच्या शिवसेना प्रवेशामुळे गोंडपिपरी तालुक्यात शिवसेनेला अधिक बळ प्राप्त झाले आहे.
Comments are closed.