Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर सेवेत सामावण्यासंदर्भात कार्यवाही त्वरित करावी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 12 जून – गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासन सेवेतील गट-अ व गट-ब च्या पदावर अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासन सेवेतील गट-अ व गट-ब च्या पदावर अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासन सेवेतील गट-अ व गट-ब च्या पदावर अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी. यासाठी सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात असे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.