गडचिरोली जिल्ह्यात 1,072 शाळा पाचवी ते आठवी पर्यंतच्या सुरू
गडचिरोली, दि. 27 जानेवारी:- कोरोनाच्या संसर्गामुळे नऊ महिन्यापासून शाळा बंद होत्या मात्र नुकतेच राज्य शासनाच्या आदेशानंतर आजपासून 1072 शाळा कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पणे नियमाचे पालन करुण शाळा सुरू करण्यात आले आहेत.
आज जिल्हाभरात शाळा सुरू झाल्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी 38182 (51.62 %) विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे.

जिल्हाभरातील शाळा सकाळी 11:00 वाजता सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे तापमान मोजून, सॅनिटायझर मास्क घालूनच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.
जिल्ह्यातील 1088 शाळांमध्ये पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या 3044 आहे. त्यातील 2870 शिक्षकांची पूर्णा चाचणी करण्यात आली आहे. त्यातील 16 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काही शिक्षकांची तपासणी अद्याप होणे बाकी आहे . एकूण 58178 विद्यार्थी आहेत .त्यापैकी आज शाळेच्या पहिल्याच दिवशी 38122 (51.62%) शाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिति दर्शविली आहे.
Comments are closed.