Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यामध्ये १०० टक्के तंत्रज्ञानाचा वापर करून पहील्यांदाच होणार पोलीस शिपाई व चालक पदाची भरती प्रक्रिया

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ३१ डिसेंबर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण जिल्ह्यासाठी जाहीर केलेल्या १४००० पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेचे प्रवेशपत्र policerecruitment 2022.mahait.org या वेबसाईवर उपलब्ध झालेले असून, गडचिरोली पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या ३४८ पोलीस शिपाई व १६० चालक पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया ही दिनांक ०२ जानेवारी २०२३ रोजी पासुन गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार असून, पोलीस शिपाई पदाकरीता एकुण १९, ९०३ आवेदन अर्ज प्राप्त झाले असून, त्यामध्ये पुरुष १४६७८ व महिला ५२२ आहेत. तसेच चालक पोलीस शिपाई पदाकरीता एकुण ५५८१ आवेदन अर्ज प्राप्त झाले असून, त्यामध्ये पुरु ५३१६ व महिला २६५ आहेत. असे एकुण २५,४८४ आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत.

गडचिरोली पोलीस दलाच्या इतिहासात पहील्यांदाच १००% आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन यावर्षीची पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यामध् बायोमॅट्रीक पद्धतीने उमेदवारांची नोंदणी, इलेक्ट्रॉनीक आधारीत उंची व छाती मोजमाप, आरएफआयड आधारीत १६०० मीटर व १०० मीटर धावणे आणि इन्फ्रारेड (IR) तंत्रज्ञानाचा वापर करुन गोळाफेकच्च लांबीचे मोजमाप करुन सदरची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच दिनांक ०२/०१/२०२३ ०४/०१/२०२३ रोजी पर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवाराची शारीरिक चाचणी होणार असून, दिनां ०५/०१/२०२३ रोजी चालक पदासाठी महिला उमेदवाराची शारीरिक चाचणी प्रक्रिया होणार आहे. सोबत दिनांक ०६/०१/२०२३ ते १४/०१/२०२३ रोजी पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवाराची शारीरिक चाचणी होणार असून, शेवटचे तीन दिवस दिनांक १५/०१/२०२३ ते १७/०१/२०२३ रोजी पर्यंत पोलीस शिपा पदासाठी महिला उमेदवाराची शारिरीक चाचणी प्रक्रिया होणार आहे. सदरची शारीरिक चाचणी प्रक्रिया रविवार दिवस वगळून होणार आहे याची उमदेवारांनी नोंद घ्यावी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तरी, सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, आपण आपले प्रवेशप policerecruitment2022.mahait.org या वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करुन घ्यावे, तसेच प्रवेशपत्राव नमूद असलेल्या शारीरिक चाचणीची तारिख लक्षात घेऊन भरती प्रक्रियेसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक कागदपत्रानिशी उपस्थित राहावे. तसेच उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये कोणीही आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान क दुरध्वनी क्र. ८८०६३१२१०० यावर तसेच उपविभागीय कार्यालय / पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे माहिती द्यावी, अ आवाहन गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केलेले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात मच्छिमारी सहकारी संस्था स्थापन करा – आमदार भाई जयंत पाटील यांची विधान परिषदेत मागणी

राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन

 

 

Comments are closed.