गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 18 नवीन कोरोना बाधित तर 19 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 07 जानेवारी: आज जिल्हयात 18 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 19 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9139 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8851 वर पोहचली. तसेच सद्या 184 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 104 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नविन मृत्यूमध्ये चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील 67 वर्षीय पुरुष एचटीएन तसेच पॅरालिसिसने ग्रस्त होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.01 टक्के तर मृत्यू दर 1.14 टक्के झाला.
नवीन 18 बाधितांमध्ये गडचिरोली 5, अहेरी 3, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 3, धानोरा 0, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 2, सिरोंचा 1, व वडसा येथील 2 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 19 रूग्णांमध्ये गडचिरोली 6, अहेरी 3, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 1, मुलचेरा 1, सिरोंचा 0, कोरची 1, कुरखेडा 0, व वडसा मधील 2 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील नवेगाव 3, न्यु इंग्लिश स्कुल जवळ 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये बोडधा 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सुभाष वार्ड 1, स्थानिक 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये कुंजेवारका 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये बारसवाडा 1, स्थानिक 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये शिवराजपुर 1, गांधी वार्ड 1, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1 जणाचा समावेश आहे.
Comments are closed.