गडचिरोली जिल्ह्यात आज 3 नवीन कोरोना बाधित तर एकही कोरोनामुक्त नाही
गडचिरोली, दि. 20 फेब्रुवारी: आज जिल्हयात 3 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज एकही जण कोरोनामुक्त झालेले नाही. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9452 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9288 वर पोहचली. तसेच सद्या 59 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.26 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.62 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.
नवीन 3 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 2 जणाचा समावेश आहे. तर चामोर्शी 01 जणाचा समावेश आहे. आज एकही कोरोनामुक्त झालेले नाही.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सर्वोदय वार्ड 01, सोनापूर कॉम्पलेक्स 01, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये अंबेडकर वार्ड क्र.07 येथील 01 बाधिताचा समावेश आहे.
Comments are closed.