Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 34 नवीन कोरोना बाधित तर 7 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 17 मार्च: आज जिल्हयात 34 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9966 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9591 वर पोहचली. तसेच सद्या 267 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.24 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.68 टक्के तर मृत्यू दर 1.08 टक्के झाला.

नवीन 34 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 19, अहेरी तालुक्यातील 1, आरमोरी तालुक्यातील 6, चामोर्शी तालुक्यातील 1, धानोरा तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 3, वडसा तालुक्यातील 3, जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 7 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 6 तर वडसा मधील 1 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये कॅम्प एरिया 1, मुरखडा 1, रामपुरी वार्ड 1, जामामजीद 1, शाहु नगर 2, स्थानिक 1, बजरंग नगर 1, रेड्डी गोडाऊन चौक 3, रिलायस्न पेट्रोल पंप 1, नवेगाव 1, कनेरी 1, महिला कॉलेज जवळ 1,नवेगाव ग्रामसेवक कॉलनी 1, इग्लीश स्कुल जवळ आनंद नगर 2, आदिवासी ऑफीस आयटीआय डीपी जवळ 1, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये शिवाजी वार्ड 1, आमगांव 2, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान नगर 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, वैरागड 3, वनकी 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ कॅम्प 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये बोदलदंड 3, जणांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 0 जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.