गडचिरोली जिल्ह्यात आज 4 नवीन कोरोना बाधित तर कोरोनामुक्ताची संख्या निरंक
गडचिरोली, दि. 16 फेब्रुवारी: आज जिल्हयात 4 नवीन बाधित आढळून आले. तर आज कोरोनामुक्त संख्या निरंक आहे. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9416 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9282 वर पोहचली. तसेच सद्या 29 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.58 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.31 टक्के तर मृत्यू दर 1.12 टक्के झाला.
नवीन 4 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 3 जणाचा समावेश आहे. तर वडसा तालुक्यातील 1 जणाचा समावेश आहे आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाची संख्या निरंक आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कन्नमवार वार्ड 1, कोटगल 1, गणेशनगर 1, वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक 1, तर इतर जिल्हयातील 0, बाधिताचा समावेश आहे.
Comments are closed.