Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 23 जून : आपला देश अखंड ठेवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे थोर राष्ट्रीय नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज दि. 23 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, गडचिरोली न.पंं. च्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, न.पंं. चे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्या हस्ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, महिला आघाडीच्या तालुका महामंत्री दुर्गाताई काटवे, श्यामकांत वाढई, राकेश राचमलवार, युवराज बोरकुटे, स्वीयसहाय्यक रविंद्र भांडेकर व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली येथे 27 जुन ला स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन शिबीर

आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा २५ जून ला सन्मान

पिक कर्ज द्या अन्यथा नक्षलवादी होण्याची परवानगी द्या! – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अजबच मागणी

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.