आदिवासी विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षणाचा शुभारंभ
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 02 ऑगस्ट- आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे सन 2024-25 वर्षातील स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राज्यकर उपआयुक्त मुकेश राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी दि.रा.धोने उपस्थित होते.
यावेळी राठोड यांनी उमेदवारांना, प्रयत्नांचे सातत्य आणि नियोजन करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येते, याबाबत मार्गदर्शन केले. तर धोने यांनी त्यांच्या विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती उमेदवारांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी आपल्या विभागाच्या संपूर्ण योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सविस्तर माहिती उमेदवारांना दिली.
यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून कार्यालयात ट्रेनी म्हणून नुकतेच रुजू झालेले मनोज सिडाम यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कौशल्य विकास अधिकारी गराटे यांनी केले तर आभार प्रफुल तोडासे यांनी मानले. यावेळी सर्वांनी नवीन बॅचच्या उमेदवारांचे स्वागत करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तत्पुर्वी उपस्थित पाहुण्यांना सन्मान चिन्ह आणि विभागाची माहिती पुस्तिका देण्यात आली.
Comments are closed.