केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये वाहन स्क्रपिंग पॉलिसी मुळे भारत जगातील प्रथम क्रमांकाचे ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येईल- केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ६ फेब्रुवारी: पंधरा वर्षांपेक्षा जुन्या भंगार वाहनाचा देखभाल खर्च तसेच त्यांची इंधन वापर क्षमता ही जास्त असते यामुळे पेट्रोल-डिझेलचा वापर पण जास्त होतो आणि पर्यायाने प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने केंद्रीय अर्थसंकल्पात स्क्रॅपिंग धोरण अवलंबिण्याचा निर्णय घेतला असून या धोरणामुळे ऑटोमोबाईल उद्योग तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. येत्या पाच वर्षात भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी आज वर्धा येथे केले. वर्धा जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना ते बोलत होते.
पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना डिझेल मुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून जैवइंधन तसेच बायो सीएनजी हे पर्याय उभे करत आहोत. येत्या 12 फेब्रुवारी रोजी बायो सीएनजी वर संचालित ट्रॅक्टरचे सुद्धा दिल्लीत लोकार्पण करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं.
जंगलावर आधारित कच्चामाल तसेच आदिवासी संस्कृती वर आधारित संशोधन संस्था निर्माण करण्यासाठी वर्धाच्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्थेला 50 कोटी रुपये सूक्ष्म लघू उद्योग मंत्रालयातर्फे देण्यात येतील अशी घोषणा सुद्धा त्यांनी केली . वर्धा ते नागपूर ग्रीन हायवे महामार्ग म्हणून विकसित करण्यासाठी विविध शैक्षणिक तसेच सामाजिक संस्थानी पुढे येऊन या महामार्गावर वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुद्धा गडकरी यांनी यावेळी केलं. शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी केंद्र सरकार हे कृषीचे वैविधीकरण हे उर्जा क्षेत्रात करत असून केंद्र शासन कृषी हितासाठी सदैव कार्यरत आहे असं त्यांनी स्पष्ट केल.
वर्धा येथील सिंदीच्या ड्रायपोर्ट मध्ये आपण लॉजिस्टिक पार्क साठी प्रयत्नशील असून कंटेनर कार्पोरेशन ऑफ इंडियाचा डेपो हा नागपुर वरून वर्धा येथे नेणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं .
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सर्व समाज घटकांचे हित साधले जाणार असून हा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारा आहे असं सुद्धा गडकरी यांनी यावेळी सांगितलं. नागपूर मेट्रो आता बुटीबोरी कन्हान हिंगणा रेल्वे प्रकल्पामुळे अमरावती वर्धा गोंदिया भंडारा सारखे सॅटेलाईट सिटी सुद्धा जोडल्या जातील हे देखील या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं .
Comments are closed.