क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकोनॉमी’चे नेतृत्व भारत करेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई:- मुंबईत होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेनमेंट समिट ‘वेव्हज 2025’च्या निमित्ताने क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा इव्हेंट होणार आहे. जागतिक दर्जाच्या या परिषदेचा मान महाराष्ट्राला मिळाला असून आता जगातील ‘क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट’ क्षेत्र मुंबईकडे आकर्षित होणार आहे. यामुळे भविष्यात ‘क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकोनॉमी’चे नेतृत्व भारत करेल, असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
‘वेव्हज 2025’च्या निमित्ताने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्व्हेंशन सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच केंद्रीय सचिव उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने मुंबईमध्ये ऑडीओ व्हिज्युअल एंटरटेंटमेंट समिट (वेव्हज) २०२५ या मनोरंजन क्षेत्रातील जागतिक संमेलनाचे १ ते ४ मे २०२५ दरम्यान ‘जिओ कन्व्हेक्शन सेंटर’ येथे हे संमेलन होईल. जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कला गुण, सृजनशीलता दाखविण्याची ही नामी संधी आहे. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल. जगाला भारताची नवी ओळख करून देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी संकल्पना आहे. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या संमेलनाच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे.
करमणूक क्षेत्राची अर्थव्यवस्था अतिशय जलदगतीने विकसित होत आहे. यात भारताने देखील अग्रेसर असले पाहिजे ही आपली भूमीका आहे. ‘वेव्हज 2025’च्या निमित्ताने शंभर पेक्षा अधिक देश भारतात सहभागी होणार आहेत. पाच हजार पेक्षा अधिक सहभागींची नोंद होणार आहे. शिवाय ही समिट दरवर्षी मुंबईत होणार असून त्यामुळे मुंबईचे महत्व जागतिक पातळीवर वाढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाची मालाडला 240 एकर जागा आहे. या जागेवर जागतिक दर्जाच्या एंटरटेनमेंट हबची व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे जगातील करमणूक क्षेत्रातील नामवंत मुंबईकडे आकर्षित होतील. त्याचबरोबर आयआयसीटी म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटीव्ह टेक्नॉलॉजी नावाची संस्था मुंबईला दिली आहे. ही महत्वाची संस्था मुंबईला दिल्याने या क्षेत्रात मुंबई जगाच्या एक पाऊल पुढे असणार आहे. मुंबई करमणूक क्षेत्राची जगाची राजधानी असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गोंदिया बल्लारशाह या रेल्वे लाईनेचे दुहेरीकरण करण्यासाठी 4819 करोड रूपये केंद्र सरकारने दिले आहे. यामुळे दुहेरीकरणामुळे विदर्भाचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व्यापार व्यवहार वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यात सर्व प्रकारच्या प्रवासासाठी एक कार्ड प्रणाली लागू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Comments are closed.