गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
योगाला आपली जीवनशैली म्हणून अंगीकारा:कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 21 जून – योग भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.शरीर व मनासाठी योगाचे असंख्य लाभ असून आपण सर्वांनी नियमितपणे योगाभ्यास करायला हवा तसेच योगाला आपली जीवनशैली म्हणून अंगी करता येईल असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात केले.आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात आयोजित सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व नागरिकांना योगदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, गोंडवाना विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली, जिल्हा क्रीडाधिकारी गडचिरोली, रोटरी क्लब, आधारविश्व फाउंडेशन, लायन्स क्लब, पतंजली योग परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग,नेहरू युवा केंद्र ,मनस्विनी मंच, सखी मंच, यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योगशिक्षिका अंजली कुळमेथे, मिलिंद उमरे , माधुरी दहीकर , किरण पवार यांच्या मार्गदर्शनात आसने, प्राणायाम, ध्यान याबाबत उपस्थितांना प्रत्याक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.पतंजली योग समितीच्या प्रणाली नैलेवार, विभा झाडे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रार्थना, ऐश्वर्या लाकडे, रमा भैसारे यांनी शांतीपाठाचे गायन केले. योग गीताचे गायन आधार विश्व च्या सदस्य अंजली देशमुख यांनी केले.तसेच मिलिंद उमरे यांनी योगासनाचे विविध प्रकार कसे उपयुक्त आहेत याची माहिती दिली .पतंजली योग समितीच्या शीतल वैरागडे यांनी योगामुळे त्यांना कसा फायदा झाला याविषयी मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखडे यांनी केले. या आंतरराष्ट्रीय योगदिन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.
अनुष्का भैसारे हिने अतिशय अवघड योगासनाचे प्रात्यक्षिक लिहिल्या करून दाखवले .सहज लयीत तिने वृश्चिकआसन, चक्रासन तसेच अग्निसार, नौली या सारख्या अवघड योग्य क्रिया करून दाखवल्या .तिच्या या योग प्रात्यक्षिकाने उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले .सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून तिला प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, अधिष्ठाता मानवविद्यान डॉ. चंद्रमौली, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या पत्नी विद्या बोकारे , संचालक शारीरिक व क्रीडा डॉ. अनिता लोखंडे उपस्थित होते.तसेच परिसरातील नागरिक, महिला, युवक-युवती, क्रीडाप्रेमी, योगपटू, महाविद्यालयातील व शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
हे पण वाचा :-
Comments are closed.