Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोककला व पथनाट्य निवड सूचीसाठी अर्ज आमंत्रित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, 4 जानेवारी : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत लोककला व पथनाट्यच्या माध्यमातून सादर करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निवड यादी तयार करण्यात येत असून यासाठी इच्छुक संस्थांकडून 21 जानेवारी पर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.

अर्ज सादर करण्यासाठी पथकाला शासकीय योजनांसह विविध विषयांवर पथनाट्य करण्याचा अनुभव असावा, पथक किमान दहा जणांचे असावे, त्यात स्री, पुरूष, वादक यांचा समावेश असावा, संस्थेची स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असावी. केंद्र सरकारच्या गीत व नाट्य विभागाकडे नोंदणीकृत असल्यास प्राधाण्य देण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निवड सूचीसाठी अर्जाचा नमुना व माहितीपत्रक जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली तसेच dgipr.maharashtra.gov.in  व www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी जिल्ह्यातील गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य बहुरूपी, भारूड इ. लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या इच्छुक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालय,  जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, बॅरक क्र.1, कॉम्प्लेक्स, गडचिरोली (दुरध्वनी क्रमांक 07132-295501) येथे 21 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ यांनी केले आहे.

Comments are closed.