हत्ती च्या जवळ जावून मत्स्करी करणे युवकाला पडले महागात
कमलापुर हत्तीकॅम्पमधील हत्ती हल्ला केल्याची पहिलीच घटना.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
कमलापुर येथील कॅम्प मध्ये सकाळी हत्तींना दैंनदिन आहार दिल्यानंतर 4:00 वाजताच्या सुमारास हत्तींना मुक्त विहारासाठी लगतच्या जंगलात सोडण्यात येतात. शनिवारी येथील हत्तीण मंगला कमलापूर-दामरंचा मार्गावर असताना काही युवक मंगला हत्तीन जवळ जाऊन आवाज व हातवारे करून डीवचन्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या मंगला हत्तीने हल्ला केला.
गडचिरोली, 25 जून – राज्यातील एकमेव वन विभागाचे शासकीय हत्तीकॅम्प कमलापुर येथे आहे.या कम्प मध्ये आठ हत्ती असून या हत्तींना सकाळी दैंनदिन आहार दिला जातो. त्यानंतर 4:00 वाजताच्या सुमारास हत्तींना मुक्त विहारासाठी लगतच्या जंगलात सोडण्यात येतात. दैंनदिनी प्रमाणे शनिवारी येथील हत्तीण मंगला कमलापूर – दामरंचा मार्गावरून रस्ता ओलांडत असताना जवळ जाऊन युवकाने मत्स्करी करणे सुरू केले.
हत्ती च्या जवळ जावून मत्स्करी करणे युवकाला पडले महागात #gadchiroli #kamalpur #hatticamp #gadchiroliforest pic.twitter.com/eO9I40WZsO
— loksparshnews (@loksparshnews) June 25, 2023
युवक हत्ती जवळ जावून हातवारे करीत हतीला बांधलेल्या लोखंडी साखळदंड ला खीचाण्याचा प्रयत्न केला शेवटी शांत असलेल्या मंगला हत्तीला चीड येताच युवकांवर हल्ला चढवला त्यावेळीं युवक दुचाकी टाकून पळून गेल्याने बालाबाल बचावला मात्र दुचाकीचा हत्तीने चेंदामेंदा केला.
Comments are closed.