Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जालना: ओबीसींची जनगणना करा, ओबीसींचा रविवारी महामोर्चा

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. २२ जानेवारी:  सन 2021 च्या जनगणनेत ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून या जनगणनेची अधिकृत आकडेवारी जाहीर करावी. या आणि अन्य प्रमुख मागण्यांसाठी जालना शहरात येणाऱ्या 24 जानेवारी रोजी ओबीसी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जालना जिल्हा ओबीसी मोर्चा समन्वय समिती च्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असंविधानिक नॉन क्रिमिलेअर ची अट रद्द झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना एससी, एस.टी, विद्यार्थ्यांप्रमाणे 100% शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, राज्यातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय अस्थापनांमध्ये झालेल्या दोषपूर्ण बिंदू नामावलीची चौकशी करून नव्याने बिंदू नामावली तयार करावी, मंडल आयोग लागू होऊनही केंद्र व राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ओबीसींना 27% प्रतिनिधित्व मिळाले नाही हा बॅकलॉग तात्काळ भरावा, ओबीसी, भटके विमुक्त व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालुका स्तरावर निवासी हॉस्टेल झाले पाहिजे, महाज्योतीला 2 हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा इत्यादी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पत्रकार परिषदेत माहिती देतांना समन्वय समितीचे पदाधिकारी अशोक पांगारकर

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते अंबड चौफुली पर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चासाठी ओबीसी समाजाचे जेष्ठ नेते तथा राज्याचे ओबीसी मंत्रालयाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सह संजय राठोड, हंसराज अहिर, माजी मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राजीव सातव, समीर भुजबळ, महादेव जानकर हे देखील या महामोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती ओबीसी समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.