जामगाव रिठ येथील अतिक्रमण नियमानुसार करून कायमचे पट्टे मिळवून दया:-अतिक्रमण धारकांची मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी ३१-ऑक्टो :- जामगाव रिठ येथील पैडीगुंडम कक्ष १८५ मधील अतिक्रमण नियमानुसार करून कायमचे पट्टे मिळवून दया अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना अतिक्रमण धारकांनी निवेदनातून केली आहे.
अतिक्रणमण धारकांचा पांरपारिक व्यवसाय शेती हा प्रमुख व्यवसाय असून त्याला जोडधंदा मासेमारी हा धंदा सुध्दा करत असल्याने अतिक्रमण धारकांच्या वडीलांचे पुर्वज हे सन १९७८ पुर्वीपासून वनपरिक्षेत्र पैडीगुडम अंतर्गत येत असलेल्या गोमणी हद्दीतील कक्ष क्रमांक 185 जामगाव रीठ या क्षेत्रात वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आप आपल्या कुटुंबाचे पालन पोषण तसेच उदरनिर्वाह चालवून आप आपल्या संपूर्ण गरजा याच शेतीवर भागवीत असतांना निसर्गाच्या अवकृपेने तसेच लहरी पावसाने सतत नापिकीमुळे कुटुंबीयांचे उदरनिर्वाह करणे आवश्यक होत गेल्याने कुटुंबियांना घरी ठेवून बाहेर गावी जावून मिळेल ते काम करून कुटुंबीयाचा उदरनिर्वाह करीत कक्ष १८५ मधील अतीक्रमण नियमानुसार करून खसरा पंजी मध्ये नावे नांद होण्यास व कायमचे पट्टे मिळविण्याकरिता बोरी येथील दिवंगत माजी सरपंच तथा माजी सभापती पंचायत समिती चामोर्शी तसेच तालुका इंदिरा काँग्रेस कार्यकारी मंडळाचे सदस्य मलयाची रामलूजी ओलालवार बोरी यांच्या हस्ते माँजी मुख्यमंत्री नामदार वसंतदादा पाटील यांना नागपूर येथे २५ ऑक्टोबर १९७७ रोजी आम्हास पट्टे मिळण्याकरिता निवेदन सादर करण्यात आले होते. व त्यानंतर त्यांच्याच हस्ते राज्यपाल यांना सुध्दा ५ नोव्हेंबर १९७७ रोजी कायमस्वरूपात पट्टे मिळण्यासंबधी निवेदन सादर केले असतांना सुध्दा कायमचे पट्टे मिळाले नाही तेव्हा काही दिवसांनी वर्षांनी आमचे पूर्वज पुन्हा त्यांच्याच हस्ते महसूल मंत्री नामदार शांतारामजी धोलप यांना नागपूर येथे १५ नोव्हेंबर १९८४ रोजी निवेदन सादर करून देखील अजून पर्यंत आम्हास कायमचे पट्टे तर सोडा निदान महसूल विभागकडून खसरा पंजी मध्ये आमचे नाव दर्ज सुध्दा झालेले नसतांना आम्ही पुन्हा शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्याचा संकल्प करून शेती व्यवसाय सुरू करण्याकरिता शेतात झालेले लहान झुडपे तोडून सफाई करू लागलो तेव्हा वनविभागाचे अधिकारी व कर्मचायानी आम्हाला मारझोड करून पोलिस कार्यवाहीची भिती दाखविली परंतु आम्ही त्यांच्या भितीला न घाबरता परत सन 2008 मध्ये त्या ठिकाणी शेती करण्याकरीता तेथील झाडे झुडपे साफ करून शेती करण्यास सुरूवात केली असतांना १५ नोव्हेंबर २०१३ रोजी वनपाल पैडीगुंडम क्षेत्र यांनी आम्हाला मोक्यावर अतिक्रमण वन कायदा अंतर्गत आमच्यावर पी ओ आर जारी केले.
आम्हाला वेळोवेळी शेती सोडण्यास दबाव आणला जात होता परंतू आम्ही आमचा मुख्य व्यवसाय शेती करून पोट भरणे हाच असल्याने आम्ही शेती सोडली नाही तेव्हा परत वन कर्मचारी आमच्यावर १ डिसेंबर २०१५ रोजी वन गुन्हा नोंदवून आम्हास अटक करून तालुका दंडाधिकारी चामोर्शी यांच्या समोर २९ डिसेंबर २०१५ ला हजर करून एम.सी.आर मिळवून आम्हाला चंद्रपूर येथील सेंट्रल कारागृहात ८ दिवस सराईत चोराप्रमाणे डांबण्यात आले हा एक प्रकारचा आमच्यावर अन्याय झालेला आहे.
करीता आपण आमचा शेती करणे गुन्हा आहे का आमची शेती वनविभागाने जबरीने आपल्या ताब्यात घेतल्याने आम्हास व आपच्या कुटुुंबावर उपासमारीची पाळी ओढवून दारोदारी भिक मागण्याची पाळी आलेली असल्याने आपच्या सर्व अडचणींचा व यातील सर्व बाबींचा तसेच परिस्थितीचा विचार करून आमचे वन विभागाने ताब्यात घेतलेली शेतजमीन परत मिळवून देण्याची मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनातून केली आहे.
निवेदन देतांना बाला मंचर्लावार, राकेश कंम्पेवार, बिच्छु कम्पेलवार, रामा कंम्पेलवार, लचमा संगतीवार, अजय सिडाम, पोच्या बलचपल्लीवार, चंदु सुर्लावार, व्यंकटेश बाकीवार तसेच इतर बोरी तथा राजपूर पॅच येथील अतिक्रमणधारक उपस्थित होते.
Comments are closed.