जनसंघर्ष समिती तर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकींचा सत्कार
भामरागड, ०४ जानेवरी: भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम नक्षल प्रभावित “हिंदेवाडा” या गावी जनसंघर्ष समिती नागपूर तर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भामरागड तालुक्यातील कर्तुत्ववान 16 महिलांना सावित्रीच्या लेकी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित सत्कार समारंभाला जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के, पंचायत समिती भामरागड चे गट शिक्षण अधिकारी धम्मानंद मेश्राम पंचायत समितीचे सभापती गोईताई कोडापे, सेवानिवृत्त शिक्षक कोडापे, माजी सरपंच सुधाकर तिम्मा, महाका, प्रा. पराग सपाटे, रितेश बडवाईक, गोलू ठाकरे, महेश ढोबळे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व महिलांना साडी प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत गायन करण्यात आले. प्रास्ताविकातून दत्ता शिर्के यांनी जन संघर्ष समितीची भूमिका व समिती प्रवास यावर प्रकाश टाकले. तर प्रा. पराग सपाटे व धर्मानंद मेश्राम आदी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज पोर्ते तर आभार प्रदर्शन रितेश बडवाईक यांनी केले.
Comments are closed.