नागपुरात जोशी, वंजारींचे अर्ज दाखल .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर दि. १२ नोव्हेंबर : नागपर विभाग पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता आज १२ नोव्हेंबर रोजी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख होती. भाजप उमेदवार संदीप जोशी व काँग्रेसचे अॅड. अभिजित वंजारी यांनी आपला अर्ज सादर केला. यापूर्वी वंचित बहुजन आघाडी, विदर्भवादी संघटना यांंच्या उमेदवारांनीही आपापले अर्ज दाखल केले आहेत.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अॅड. वंजारी यांनी नामांकन कर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केला. तर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपतर्फे नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी अर्ज भरला. तसेच आतापर्यंत राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), शिवाजी सोनसरे यांनी भाजपसह अपक्ष, अमित मेश्राम (अपक्ष), राजेंद्र भुतडा (अपक्ष), नितेश कराळे (अपक्ष), अड. सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवधिकार), संजय नासरे (अपक्ष), गोकुलदास पांडे (अपक्ष) यांनी दोन अर्ज भरले, तसेच धर्मेश फसाटे यांनीही अर्ज भरला. प्रशांत डेकाटे (अपक्ष), रामराव चव्हाण (अपक्ष), अविनाश तुपकर (अपक्ष) व अतुलकुमार खोब्रागडे (अपक्ष) यांनी अर्ज भरले आहेत.
नागपूर विभाग पदविधर मतदारसंघ निवडणुकीत पत्ता कट करण्यात आल्यानंतर भाजपचे निवर्तमान आमदार प्रा. अनिल सोले यांच्याकडे या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणूक जिल्हाप्रमुखांचीही निवड करण्यात आली आहे. निवर्तमान आ. सोले यांची उमेदवारी कापून महापौर संदीप जोशी यांना भाजपने मैदानात उतरविले आहे. प्रा. सोले समर्थकांचा फटका बसू नये, याकरिता आता नाराज माजी आ. सोले यांच्याकडेच जोशी यांच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली. या निवडणूक समितीमध्ये त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. याशिवाय माजी आमदार सुधाकर देशमुख, आ. रामदास तडस, आ. गिरीश व्यास, आ. परिणय पुâके, खा. रामदास तडस, खा. अशोक नेते, खा. सुनील मेंढे, प्रदेशमंत्री अर्चना डेहनकर, प्रदेशमंत्री धर्मपाल मेश्राम व राजेश बकाने, तारिक कुरेशी, सुधीर दिवे, माजी आमदार चरण वाघमारे, जयप्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे.
भाजपच्या मंगलम् कार्यालयात शहर भाजपची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हानिहाय जिल्हा निवडणूक प्रमुखांची नावे घोषित करण्यात आली. नागपूर शहरप्रमुख आ. प्रवीण दटके, नागपूर ग्रामीणप्रमुख डॉ. राजीव पोतदार व अरविंंद गजभिये, भंडारा- बाळा काशिवार, गोंदिया- आ. विजय रहांगडाले, गडचिरोली- किसन नागदिवे, चंद्रपूर – राजेंद्र्र गांधी, चंद्रपूर ग्रामीण – देवराव भोंगळे आणि वर्धा- डॉ. शिरीष गोडे यांंची निवड करण्यात आली. या बैठकीत जोशी यांना विजयी करण्यासंदर्भात निवडणूक रणनीती ठरविण्यात आली. सर्व कार्यकत्र्यांना निवणूक कामाला लागण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले.
Comments are closed.