नांदेडमधल्या कामेश्वर वाघमारे या १४ वर्षाय मुलाला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर
नांदेड, दि. २४ जानेवारी: केंद्रसरकारच्या बालशौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारे या १४ वर्षाच्या मुलाला जाहीर झाला आहे. कामेश्वर ने जिवाची बाजी लावून दोन बालकांना वाचविले होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार सोहळा दिल्लीत होणार आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. कोव्हिड मुळे हा पुरस्कार सोहळा आँनलाईन होणार आहे.

गेल्या वर्षी कंधार तालुक्यातील घोडज गावाजवळ 22 फेब्रुवारी 2020 रोजी मन्याड नदीत 3 मित्र पोहण्यासाठी गेले होते. ओम मठपती, गजानन श्रीमंगले आणि आदित्य डुंडे असं या तिघांचं नाव होतं. ते पोहण्यासाठी नदीत उतरले, मात्र या तिघांना नीट पोहता येत नव्हतं. ते बुडत असताना कामेश्वर वाघमारे या मुलाने पाहिलं. कामेश्वरने जीवाची बाजी लावत गजानन आणि आदित्यला वाचवलं. मात्र, यावेळी ओम मठपती या मुलाचा मृत्यू झाला.
केंद्र सरकारने कामेश्वरच्या या पराक्रमाची दखल घेत केंद्र सरकारने शौर्य पुरस्कारासाठी त्याची निवड केली. कामेश्वरला हा पुरस्कार मिळावा म्हणून कंधार चे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बराच पाठपुरावा केला होता. आता त्याला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कामेश्वर चा सत्कार ही केलाय. त्यासोबतच घोडज इथल्या गावकऱ्यांनी आमदार शिंदे यांचे आभार मानले.
Comments are closed.