कन्हारगाव अभयारण्य घोषित.
10 नविन संवर्धन राखीव क्षेत्राना मान्यता राज्य वन्य जीव मंडळाच्या 16 व्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमतः घोषित झाल्यानंतर त्याचा झोनल मास्टर प्लॅन जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात तयार करावा हे करताना वन, पर्यावरण, महसूल, नगरविकास अशा संबंधित विभागाचे सहकार्य घ्यावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश.
- आंबोली डोडा मार्ग कनझर्वेशन रिझर्व्ह- सिंधुदुर्ग
- चंदगड कनझर्वेशन रिझर्व्ह- कोल्हापूर
- आजरा- भुदरगड कनझर्वेशन रिझर्व्ह- कोल्हापूर
- गगनबावडा कनझर्वेशन रिझर्व्ह- कोल्हापूर
- पन्हाळगड कनझर्वेशन रिझर्व्ह- कोल्हापूर
- विशाळगड कनझर्वेहन रिझर्व्ह- कोल्हापूर
- जोर जांभळी कनझर्वेशन रिझर्व्ह-सातारा
- मायनी क्लस्टर कनझर्वेशन रिझर्व्ह- सातारा
पश्चिम घाटातील या 8 संवर्धन राखीव क्षेत्रामुळे वन्यजीवांचा भ्रमण मार्ग मोठ्याप्रमाणात संरक्षित झाला. विदर्भातील महेंद्री, मुनिया या क्षेत्रास ही संवर्धन राखीवचा दर्जा देण्यास मान्यता.
वाघा प्रमाणे बिबट्या आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करा.
अवनी वाघिणीच्या पिल्ल्याची संपूर्ण वाढ झाली असून या पिल्ल्याला पेंच येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यास NTCA ची मान्यता.
नवीन ट्रान्झिकट् ट्रीटमेंट सेंटर सुरू करण्यासाठी नाशिक पुणे येथून प्रस्ताव प्राप्त, जुन्या ट्रान्झिकट सेंटरला निधी देऊन सक्षम करण्याचा निर्णय.
कन्हारगाव अभयारण्य घोषित. एकूण क्षेत्र 269 चौ की.मी.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी नियुक्त समितीचा अहवाल लवकरच शासनास सादर होईल.
चांदा ते बांदा पर्यंत जे महाराष्ट्राचे वन वैभव आहे त्याचे विविध ऋतू तील वैशिष्ट्य टिपण्यास वन रक्षकांना सांगावे, त्याचा दर्जा उत्तम राखावा, यावरून राज्यासाठी आपण एक चांगली फिल्म तयार करू.
राज्यात पूर्वी चे 6 आणि नवीन घोषित तिलारी अशी मिळून 7 संवर्धन राखीव आहेत. त्या क्षेत्रात महत्वाची कामे करण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी द्यावा या वन विभागाच्या मागणीवर प्रस्ताव पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
महेंद्री ला संवर्धन राखीव घोषित करताना भविष्यात त्याचे अभयारण्यात रूपांतर करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा.
आजच्या बैठकीत राज्य वन्य जीव मंडळाच्या सदस्यांनी ज्या सूचना केल्या त्याचे मुखमंत्र्याकडून स्वागत.
जंगलावर लोकांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी वन विभाग करत असलेल्या प्रयत्नासाठी मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन! असे च प्रयत्न केल्यास वन किंवा अभ्यारण्याबद्दल लोक अधिक सकारात्मक होऊन संवर्धनात सहकार्य करतील.
Comments are closed.