Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोकण म्हाडाच्या २ हजार १४७ सदनिका आणि भूखंड विक्रीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत.

लोकस्पर्स न्यूज नेटवर्क

म्हाडा कोकण विभाागाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २ हजार १४७ सदनिका आणि भूखंड विक्रीची सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाली. म्हाडा नागरिकांच्या स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करत असून, म्हाडा मध्ये पारदर्शकता असल्याने म्हाडाची विश्वासार्हता वाढली आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. तर या कार्यक्रमाला उपस्थित अनेकांना आज घरं मिळाली आहेत, तर ज्यांना नाही मिळाली त्यांनी नक्कीच पुढच्या वेळी मिळतील, असं सांगत, ज्या नागरिकांना लाॅटरी लागली आहे, त्यांना लवकरात लवकर घर मिळण्यासाठी काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

तसंच घरबांधणीत गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं ते म्हणाले. घरांची गुणवत्ता चांगली असावी, यासाठी सरकार पूर्णपणे मदत करेल. गरज पडल्यास गृहनिर्माण संदर्भातल्या नियमांमध्ये बदलही केले जातील, असे ते म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सरकार नवीन गृहनिर्माण धोरण आणत असून, यामध्ये महिला, ज्येष्ठ, पोलिस, गिरणी कामगार, सर्व नागरिकांचा विचार केला जाणार आहे. या धोरणात पारदर्शकता असेल, असं शिंदे यांनी सांगितलं. हे सरकार शेतकरी, कष्टकरी,नागरिकांच्या सुखाचं विचार करणार सरकार आहे असं सांगत, गेल्या अडीच वर्षात आपण रखडलेली अनेक कामं मार्गी लावल्याचं त्यांनी सांगितलं.

Comments are closed.