Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Tauktae Cyclone: मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

नुकसानग्रस्त भागांची पाहाणी केल्यानंतर त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रत्नागिरी, 21 मे: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांनी वादळाचा फटका बसलेल्या ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. रत्नागिरीत तौत्के चक्रीवादळानं नेमकं किती नुकसान झालं आहे, याबाबतचे पंचनामे पूर्ण होवू द्या. संपूर्ण आढावा घेऊन पीडितांना योग्य ती मदत केली जाईल. यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी येथे केले.

जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत आढावा घेतला. तौत्के चक्रीवादळानं जिल्ह्यातील 5 तालुक्यांना जबरदस्त फटका दिला आहे. यात सर्वाधिक नुकसान  राजापूर आणि रत्नागिरी तालुक्याचं झालं आहे. जिल्ह्यात चक्रीवादळानं आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीनं पंचनामे करून नेमकी आकडेवारी सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चक्रीवादळात रत्नागिरी जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 8 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर एकूण 11 जनावरं दगावल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तौत्के चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 17 घरं पूर्णत: बाधित झाली असून अंशत: बाधित झालेल्या घरांची संख्या तब्बल 6766 एवढी आहे. याशिवाय चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील 1042 झाडं पडली आहेत.

चक्रीवादळात 59 दुकानं आणि टपऱ्यांचं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शाळांची संख्या 56 आहे. या सर्व शाळा राजापूर तालुक्यातील आहेत. चक्रीवादळानं फळबागांचं प्रचंड नुकसान केलं आहे. अंदाजे 1100 शेतकऱ्यांचं साधारणतः 2500 हेक्टर इतकं नुकसान झालं आहे. यातील 3430 शेतकऱ्यांच्या 810.30 हेक्टरवरील शेतीच्या पंचनाम्यांचं काम आजपर्यंत पूर्ण झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.