Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवघ्या वीस दिवसांचा असणार कुरखेडा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ, निवडणूक होणार की पुन्हा कोर्टात प्रकरण रेंगाळणार?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कुरखेडा 1-नोव्हेंबर :-
कोर्ट कचेरीच्या वादात अडकलेल्या कुरखेडा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक नगरपंचायतीचा पाच वर्षाचा कालावधी संपण्याच्या 20 दिवस अगोदर होऊ घातल्यामुळे नगर अध्यक्षाच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापू लागले आहे येत्या 9 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार निवडून आलेल्या नगराध्यक्षाला केवळ वीस दिवस खुर्चीवर बसता येणार आहे असे असले तरी राजकीय डावपेचात अध्यक्षपदाची निवडणूक होणार की पुन्हा कोर्ट कचेरीच्या वादात अडकणार याकडे नगरवासीयांचे लक्ष लागून आहे

नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाला धोबीपछाड देत शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने पहिल्या अडीच वर्षासाठी सत्ता काबीज केली होती शिवसेनेचे महेंद्रकुमार मोहबंसी पहिले नगराध्यक्ष ठरले यानंतर दुसऱ्या कालावधी करिता येथील अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला करिता राखीव झाल्याने अनुसूचित जमाती महिला निवडून आलेल्या काँग्रेसच्या अशा तुलावी तुलावी व पहिल्या कालावधीत शिवसेनेसोबत असलेल्या अपक्ष उमेदवार शाहेदा मुगल (शारदा उईके ) भाजपच्या तंबूत दाखल झाल्यात त्यामुळे भाजपचे संख्याबळ वाढले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अध्यक्ष पदाच्या निवडणूकी दरम्यान नगरसेवक मनोज सिडाम यांनी यांनी शाहेदा मुगल यांच्या जात प्रमापत्रावर हरकत घेत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला या निकालाविरोधात शाहेदा मुघल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने मागील दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून ही निवडणूक प्रलंबित होती त्यामुळे अध्यक्ष पदाचा प्रभार विद्यमान उपाध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

नगरपंचायतचा पहिल्या पाच वर्षाचा कालावधी येत्या 29 नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे अशातच नऊ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केला आहे त्यानुसार निवडणूक झाल्याच्या दिवसापासून जरी कालावधी पकडला तरी केवळ वीस दिवसाची सत्ता सांभाळता येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.