ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत पुढे ढकलली इच्छुकांच्या अपेक्षांवर फिरले पाणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 03 फेब्रुवारी :- गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत उद्या चार फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार असताना राज्य शासनाकडून ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत रद्द करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच दोन टप्प्यात पार पडल्या होत्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याने शासनाने जाहीर केले होते त्यानुसार प्रशासनाच्यावतीने फेब्रुवारी सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार होती बैठकीचे स्थळ निश्चित करण्यात आले होते मात्र आज तीन रोजी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम रद्द झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .
Comments are closed.