विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 07 जुलै – ठाकरे गटाला मोठा धक्का. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे. पण, नीलम गोऱ्हे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून शिवसेनेत प्रवेश का गेला याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
आज गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यांवर निशाणा साधला आहे. निलम गोऱ्हे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नीलम गोऱ्हे यांचं पत्र
‘गेल्या 25 वर्षांपासून एनडीएसोबत राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना या पक्षात मी प्रवेश केला होता. शिवसेनेत मला खूप चांगले काम करता आले. सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत आहे. केंद्रीय स्तरावर एनडीएने आणि भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येत श्रीराम प्रभूंचे मंदिर, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज आणि समान नागरिक कायद्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहे.पंतप्रधान मोदी आणि अमनित शहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे, असं नीलम गोऱ्हे पत्रात म्हणाल्या.
हे पण वाचा :-
Comments are closed.