उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 16 जून – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहे. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.
ही आहेत शिबिराची स्थळे:
दि. 19 जुन 2023 रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 22 जुन रोजी एन.एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 23 जुन रोजी शरद पवार महाविद्यालय गडचांदुर, 26 जुन रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर, तर 27 जुन रोजी शासकीय विश्रामगृह गोंडपिपरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला दिलेल्या शिबिराचे ऑनलाइन अपॉइंटमेंट कार्यालयामार्फत खुले करण्यात येतील याची नागरीकांनी नोंद घ्यावी.
हे पण वाचा :-
Comments are closed.