लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनचे खेळाडू राज्य क्रीडा स्पर्धांमध्ये झळकले;मोनिकाची राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीने उभारलेल्या क्रीडा संकुलामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २० मे: लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनच्या क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये ठसा उमटवत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर (अंडर-२०) अॅथलेटिक्स स्पर्धा-२०२५ मध्ये हेडरी येथील मोनिका सन्नू मडावी हिने उंच उडी स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले असून तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लॉयड्सच्या क्रीडा संकुलातीलच यश पांढेकर याने १०,००० मीटर शर्यतीत चौथे स्थान पटकावले. ही दोन्ही कामगिरी गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रेरणादायक असून आदिवासी भागातील तरुणांमध्ये लपलेल्या क्रीडा प्रतिभेची ठळक ओळख करून देणारी ठरली आहे.
दरम्यान, विदर्भ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा-२०२५ साठी झालेल्या जिल्हास्तरीय निवड चाचण्यांमध्ये लॉयड्स क्रीडा संकुलाच्या आठ खेळाडूंची राज्यस्तरीय शिबिरासाठी निवड झाली आहे. यात पाच मुली आणि तीन मुलांचा समावेश आहे. पायल तलांडी, समीरा गोटा, विद्या गावडे, आशा नरोटी, सपना पुंगाटी, महाश कुडे, स्वतंत्र आडे आणि अमोल वारसे अशी या खेळाडूंची नावे असून २२ मे रोजी गडचिरोली येथे हे शिबिर होणार आहे.
या यशस्वी वाटचालीबाबत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीने उभारलेल्या क्रीडा संकुलामुळे जिल्ह्यातील विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याआधीही रामकृष्णपूर येथील सुजिता बिश्वास हिने राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेत तिसरे स्थान पटकावून राष्ट्रीय स्तरावर निवड मिळवली होती.
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे त्यांचा सर्वांगीण विकास घडत असून, जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्याची प्रक्रिया अधिक गतिमान झाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.
सिरोंचा बसचे ब्रेक फेल, चालकाच्या धाडसाने ८१ प्रवासी सुखरूप..
Comments are closed.