Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा तर्फ कर्ज योजना

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. 24 जून : एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कोविड-19 या जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला आहे.

त्या कुटुंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी and Support for Marginalized Individuals for Livelihoods Enterprie (SMILE) ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. सदर योजनेची माहिती आणि अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहे. तपशील/ प्रकल्प मूल्य यामध्ये रुपये 1.00 लाख ते 5.00 लाखापर्यंत यात एनएसएफडीसीचा सहभाग हा 80 टक्के असून भांडवल अनुदान 20 टक्के असेल तसेच व्याजदर हा 6 टक्के असून परतफेडीचा कालावधी हा 6 वर्ष असेल. सदर बाबीकरीता पात्रता पुढील प्रमाणे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अर्जदार हा अनुसूचित जातीतील असावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3.00 लाखपर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा (कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक). मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरीता पुढील पैकी एक दस्तावेज आवश्यक आहेत. अ) महानगर पालिका/नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र. आ) स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती. इ) एखादया गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र.

वरील बाबीकरीता आवश्यक कागदपत्रे- मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (3.00 लाखापर्यंत), कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा ह्या लिंकवर https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 भरण्यात यावी असे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  :

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे कर्ज योजना

चंद्रपूर येथे 28 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

वनविभागातील चाराकटर व महावत यांचे रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.