अमरावतीत पुढील एक आठवड्यासाठी लॉकडाऊन; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा
नागरिकांना सतर्कता राखण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन.
अमरावती, दि. 21 फेब्रुवारी: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि नागरिकांचा बेजबाबरपणा यामुळं ओढावलेलं संकट पाहता अखेर अमरावतीमध्ये पुढील आठवड्याभरासाठी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून कोरोनाशी सुरु असणाऱ्या या लढ्याच्या पार्श्वभूमीवर हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. रविवारी पार पडलेल्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
![](https://loksparsh.com/wp-content/uploads/2021/02/yashomati-thakur-in-metting-1024x682.jpg)
शनिवारी अमरावती मध्ये 1 हजारहून धिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि सर्वांनाच धडकी भरली. कोरोना नेमका किती वेगानं फैलावत आहे, याचा स्पष्ट अंदाज हे आकडे पाहून आला. परिणामी सुरुवातीला फक्त काही तासांपुरताच सीमित ठेवण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय थेट पुढील आठवड्याभरापर्यंत कायम ठेवण्यात आला. प्रशासनाच्या या निर्णयाअंतर्गत काही नवे निर्देशही देण्यात आले.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुढील 7 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये आजही विकेंण्ड लॉकडाऊन सुरू आहे. उद्या संध्याकाळपासून हा लॉकडाऊन सुरू होणार आहे. उद्या दिवसभर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
अमरावती महापालिका क्षेत्रातील तबल 60 टक्के भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. खबरदारीसाठी अमरावती शहरात तब्बल 12 प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करण्यात आली आहेत. अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 36 तासांचा वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आज रात्री उशिरा संपणार आहे. उद्या संध्याकाळी 7 पर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची मुदत देण्यात आली आहे. पुन्हा सोमवारी संध्याकाळी 7 पासून 7 दिवस लॉकडाऊन करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात वाहतूक व्यवस्था सुद्धा बंद करण्यात आली असून, जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था बंद असल्यानं याचा फटका आता बाहेरून आलेल्या प्रवाशांना बसताना दिसत आहे. बस स्थानकासमोर प्रवासी सकाळपासून ताटकळत उभं राहावं लागत आहे.
12 कंटेन्मेंट झोन घोषित
अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या 12 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला.
अमरावतीत 2,783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण
अमरावती मनपा हद्दीत सध्या 2,783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. तर अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 727 रुग्ण पॉझिटीव्ह आढळूण आले आहेत. आज 2,131 रुग्णांच्या टेस्ट झाल्या. जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर 34.11 टक्क्यांवर पोहोचला. आज एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट ठरला आहे. 359 रुग्ण घेत आहेत, अशी माहिती उपचार उपविभागीय अधीकार्यांनी दिली. अचलपूर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खळबळून कामाला लागली असून खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आली आहे.
Comments are closed.