Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाशिम शहरात साकारले लॉकडाऊन गार्डन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशिम, दि. ०१ जानेवारी: कोरोना संसर्गाच्या काळात संपूर्ण देशात लावण्यात आलेला लॉकडाऊन हा शब्द ह्या 09 महिन्याच्या काळात प्रचंड वापरल्या गेला याच शब्दावरून वाशिम शहरातील  “ड्रीम लँड सिटी” या नवीन वसाहती मधिल जनतेने लोकसहभागातून निर्माण केलेल्या बागेला “लॉक डाऊन गार्डन ” असे नाव देऊन त्या मध्ये नववर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम ठेऊन नगरवासीयांनी 2021 या नववर्षाचे स्वागत केले.

या वसाहतीसाठी असलेल्या मोकळ्या जागेवर लॉकडाऊन च्या काळात वृक्ष लावून संगोपन करण्यात आले. तसेच लोकसहभागातून जमा झालेल्या पैशातून बसण्यासाठी बेंच,  मुलांसाठी क्रीडा साहित्य आणून हे गार्डन सुरू करण्यात आले आणि येथे नववर्षाचे स्वागत करीत ह्या गार्डनचा लोकार्पण सोहळा पार पडला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.