अमरावती जिल्ह्यात लॉक डाऊन: जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आदेश
अमरावती, दि. १८ फेब्रुवारी: अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने रविवारी संपूर्ण जिल्ह्यात जनता कर्फ्यु लावण्यात लावण्यात येणार असल्याची माहिती अमरावती चे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.
हा लॉक डाऊन आठवड्यात दर शनिवारी सायंकाळी 8 वाजतापासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत असेल.
रविवारी संपूर्ण जिल्हा राहील बंद, फक्त मेडिकल आणि दवाखाने राहतील सुरू.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे अन्यथा आणखी कठोर निर्णय घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले..
Comments are closed.