Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रेमसंबंध, संशय आणि दुर्दैवी अंत; जयनगरात पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या..

दोन चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले; विवाहितेच्या मृत्यूमागे विवाहबाह्य नात्याचा संशय..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चामोर्शी : कधीकाळी प्रेमाने सुरू झालेला संसार संशयाच्या सावटाखाली उद्ध्वस्त झाला आणि अखेर एका पत्नीने आयुष्यालाच पूर्णविराम दिला. चामोर्शी तालुक्यातील जयनगर येथे गुरुवारी पहाटे घडलेली ही हृदयद्रावक घटना सध्या परिसरात चांगलीच खळबळ उडवत आहे.

संगीता श्रीनिवास सरकार (वय २८, रा. विजयनगर) या विवाहितेने घराजवळील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. संशयाचे धनी ठरले ते पती श्रीनिवास गिरेन सरकार (३४) यांच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचा तिचा संशय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रेमातून पळून लग्न, पण… 

संगीताचे श्रीनिवाससोबत २०१३ मध्ये प्रेमविवाह झाले. अल्पवयीन असताना श्रीनिवासने तिला पळवून नेल्याने तिच्या आई-वडिलांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून गुन्हाही नोंद झाला होता. काही दिवस फरार राहिल्यानंतर दोघेही हाती लागले आणि श्रीनिवासला अटकही झाली. आई-वडिलांनी नंतर माफी दिल्याने संसाराची गाडी पुढे सरकली. या सहजीवनात ब्रावन आणि श्रेयशी ही दोन अपत्येही जन्माला आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संसारात कटूता, संशयाचा विळखा..

अनेक वर्षांनी श्रीनिवासचा व्यवसाय ठेकेदारीकडे वळला आणि एटापल्लीत त्यांची ने-आण सुरू झाली. त्याच दरम्यान एटापल्लीत राहणाऱ्या एका महिलेसोबत त्याचे कथित प्रेमसंबंध असल्याचा संशय संगीताने घेतला. या मुद्द्यावरून पती-पत्नीत वादाची मालिका सुरू झाली. वाद वाढत गेले आणि अखेर संगीता माहेरी जयनगर येथे परतली.

शेवटचा निर्णय…

१४ मे रोजी रात्री सर्व कुटुंबीय झोपले असताना, संगीताने आष्टी रोडलगतच्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आणि सगळ्यांनाच हादरवून गेली.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राधा शिंदे व पोलिस नाईक अतुल मडावी करीत आहेत.

दोन चिमुकल्यांचे काय?..

या घटनेमुळे दोन निष्पाप चिमुकल्यांचे मातृछत्र हिरावून गेले असून, समाजमनाला हादरवणारा हा प्रसंग आहे. प्रेम, लग्न, संसार आणि त्यानंतर आलेली ही दुर्दैवी वेळ समाजासाठी एक गंभीर आत्मपरीक्षणाचं कारण बनली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.