Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

म.रा.म.प.सं. च्या अहेरी तालूका अध्यक्षपदी मिलिंद खोंड तर सचिव पदी अनिल गुरनुले यांची निवड

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २८ फेब्रुवारी: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना अहेरी तालुका ची कार्यकारीणी आज आलापल्ली येथील ग्रामपंचायत भवन येथे बैठकीत गठीत करण्यात आली.

या बैठकीत तालुका अध्यक्षपदी मिलिंद खोंड यांची सर्वानुमते निवड करण्यात तर सचिवपदी अनिल गुरुनूले यांची निवड करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर उपाध्यक्षपदी आसिफ पठाण, अखिल कोलपाकवार, सहसचिव पदी रामू मादेशी, कोषाध्यक्ष पदी अमोल कोलपाकवार तर तालुका संघटकपदी उमेश पेंड्याला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम व उपसरपंच विनोद आकंनपल्लीवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी झालेल्या बैठकीला संघटनेचे मावळते अध्यक्ष प्रशांत ठेपाले, म.रा.म.प.स गडचिरोलीचे जिल्हा सल्लागार ओमप्रकाश चूनारकर, म.रा.म.प.स चे विदर्भ पदाधिकारी श्रीधर दुग्गीरालापाठी, सदस्य रफिक पठाण, सुनील तुरकर, स्वप्नील तावाडे, इसरार शेख, स्वप्नील श्रीरामवार आदींची उपस्थिती होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.