Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महागाव येथे तहसीलदार ओंकार ओतारी व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने कोरोना लसीकरणाचे यशस्वी आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : तालुक्यातील महागाव बु.  व महागाव खु. येथे कोरोना लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी व महागाव (खु.)  यांच्या पुढाकाराने आज बुधवारी येथील ग्रामपंचायत मध्ये कोरोना लसीकरण शिबीर ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे महागाव (खु.) ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी १०० टक्के लसीकरण केल्यामुळे ग्रामस्थांना कोरोना लसीकरणासाठी प्रेरणा मिळाली. त्यासोबतच महागाव खुर्द च्या पदाधिका-यांनी कोरोना लसीकरणा संदर्भात घेतलेल्या पुढाकारामुळे पाऊलावर पाऊल ठेवून, प्रेरणा घेऊन महागाव बु. येथील ग्रामपंचायत पदाधिकारी लसीकरणासाठी प्रोत्साहित झाले व त्यांनी स्वतः लसीकरण करून घेऊन नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात व अहेरी तालुक्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनी नागरिकांनी लसीकरण करणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून समूह प्रतिकारशक्ती तयार होऊन कोरोनाच्या प्रकोपाला आळा घालू शकतो. ग्रामीण भागात आजही कोरोना लसीकरणाबाबत अनेक अफवा उडत असतात. त्यामध्ये नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रमाचे वातावरण तयार होत असते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती आवश्यक आहे. हे ध्यानात घेऊन अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी महागाव बु. व महागाव खु.  येथील ग्राम  पंचायतीच्या पदाधिका-यांना सोबत घेऊन कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी महागाव बु. सरपंच पुष्पा मडावी व उपसरपंच संजय अलोणे यांनी स्वतः लस घेऊन कोरोनावरील लस सुरक्षित आहे याचे उदाहरण दिले. सोबतच ग्राम पंचायतचे पदाधिका-यांनी लसीकरण करून घेतले. .

यावेळी अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, सरपंच पुष्पा मडावी, उप सरपंच संजय अलोने व सदस्य विनायक वेलादी, राजू दुर्गे, सोनी गर्गम, दिपाली कांबळे, संगिता आत्राम, लालू वेलादी आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा  :

नागदेवता मंदिरा नजीक भरधाव कार आणि ट्रकच्या धडकेत एक गंभीर तर दोन जखमी

राष्ट्रीय महामार्गालगत शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात अडकून ३ म्हशींचा मृत्यू

धक्कादायक! जन्मदात्या बापानेच तीन मुलांच्या आईस्क्रिममध्ये मिसळवलं विष, एकाचा मृत्यू

 

Comments are closed.