डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर अत्यंत काळजीपुर्वक साजरा करावा: जिल्हाधिकारी दीपक सिंगला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि.25 नोव्हेंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अत्यंत काळजीपुर्वक साजरा करणेबाबत मार्गदर्शक तत्वे प्राप्त झालेले आहे.
मार्गदर्शक सूचना:-
- कोविड-19 साथरोगाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता जिल्हयातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ज्या ठिकाणी आहात तेथूनच मन:पूर्वक अभिवादन करुन शक्यतो चैत्यभूमीवर होणारी गर्दी टाळून साथरोगांची साखळी तोडण्यात सहकार्य करावे.
- वयोवृध्द व्यक्ती, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार यासारखे आजाराने पिडीत तसेच सर्दी, ताप, खोकला यासारखे लक्षणे असेलले मंडळी यांनी शक्यतो कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे टाळावे.
- कार्यक्रमांत सहभागी होणारे नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर अथवा साबणाने हात नियमित स्वच्छ करावे, गर्दीच्या ठिकाणी दोन व्यक्तीमध्ये किमान दोन मिटर चे अंतर ठेवावे तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे किंवा गुटका पान खाने व थुंकणे बेकायदेशिर असून अशा गोष्टी टाळावे.
- महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते अशा वेळी उपरोक्त 01 ते 03 बाबीचे पालन करुन कार्यक्रमाच्या प्रवेशव्दाराशी येणाऱ्या व्यक्तीची थर्मल गनव्दारे तपासणी करुन ताप असणाऱ्या व्यक्तीस कार्यक्रमास सहभागी होण्यापासून रोखावे.
जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी निर्देशांच्या अधिन राहून शासन निर्देशाप्रमाणे कोविड – 19 साथरोग अंतर्गत गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये (कंटेनमेंट झोन वगळून) महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यास छोटया स्वरूपात आणि विशेष गर्दी न करता तसेच जनसमूहाने कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करुन कार्यक्रम पार पाडणेबाबत निर्देश दिले आहेत.
सदरील आदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
Comments are closed.